Newborn Baby Found On Road : एका इमारतीमागे नवजात बाळ आढळलं. स्थानिकांनी रडण्याचा आवाज ऐकून बाळाचा शोध घेतला. बाळ उघड्यावर सोडून त्याचे आई-वडील पसार झाले होते. बाळाच्या तोंडावर पिशवी बांधलेली आढळली.
संविधानाच्या प्रतीची विटंबना, शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यावर, दगडफेक; मुंबईकडे येणारी एक्सप्रेस रोखली
नवजात बाळाला इमारतीमागे टाकून, आई-वडील पसार
या घटनेची अधिक माहिती अशी आहे की, सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव परिसरातल्या रेणुकानगरीमध्ये एका नवजात बाळाला जन्म देऊन एका इमारतीमागे रस्त्यावरच त्याला सोडून दिलं. बाळाला केवळ सोडून न देता त्या निष्ठूर आई-वडिलांनी भयंकर प्रकार केला.
बाळाच्या तोंडावर पिशवी बांधली…
बाळाच्या तोंडावर पिशवी बांधली होती. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी ही पिशवी बांधली होती. पण सोमवारी रात्री इमारतीमधील काही लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. या बाळाच्या आवाजाच्या दिशेने लोकांनी शोधाशोध सुरू केली. बाळाचा आवाज येतोय हे ओखळून आजूबाजूचे लोक जमा झाले, त्यांनी इमारतीच्या परिसरात तपासलं असता नागरिकांना तिथे बाळ एकटंच उघड्यावर ठेवलेलं दिसलं.
मोठा निर्णय! ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील जागेबाबत कोर्टाने मान्य केला सरकारचा निर्णय; अन्य सर्व मालकी हक्क फेटाळले
Pune Crime : रडण्याचा आवाज, लोकांनी आजूबाजूला शोधलं; समोर भयंकर दृष्य; नवजात बाळाच्या तोंडाला पिशवी पाहून सर्वच हादरले
बाळ ससून रुग्णालयात दाखल
बाळ सापडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल झाले. त्यांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नवजात बाळाला अशाप्रकारे उघड्यावर कोणी सोडलं, त्याच्या तोंडावर इतक्या क्रूरपणे पिशवी कोणी बांधली याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहे. बाळाच्या आई-वडिलांनी त्याला उघड्यावर का टाकलं याचा तपास सुरू आहे.