Mumbai Kurla Best Bus Accident: कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावर बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या १० ते १२ जणांसह वाहनांनाही धडक दिली आहे. अचानकपणे बसने धडक दिल्याने अनेक जण बसच्या कचाट्यात सापडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना एलबीएस मार्गावरील आंबेडकर नगर येथे हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर साऱ्यांची तारांबळ उडाली आणि मोठी गर्दी जमा झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
एलबीएस रोड अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे, जिथे मोठे मार्केटसुद्धा आहे. यामध्येच परिसरात अचानक भरधाव बस शिरली. बसने अनेक वाहनांसह रस्त्यावर चालणाऱ्यांना देखील धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.