• Sat. Jun 20th, 2026
    Madhukar Pichad Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Madhukar Pichad Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. पिचड यांनी १९८० ते २०१४ या कालावधीत अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यादेवी नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास होता. १९८० ते २०१४ या काळात त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. १९९५ ते १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते.

    मधुकर पिचड यांनी १९६१ साली अकोले येथे अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. १९९३ साली स्थापन झालेला हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना होता. पिचड यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली नंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. २०१९ साली त्यांनी पुत्र वैभव पिचडसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *