Devendra Fadnavis: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. महिला मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केलं. त्यामुळे महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास २१०० रुपये देऊ असं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं होतं. या आश्वासनाची पूर्तता कधीपासून करण्यात येणार असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ही योजना सुरुच राहील, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.
Devendra Fadnavis: CM झाल्यानंतर फडणवीसांची पहिली स्वाक्षरी ‘त्या’ फाईलवर; शिंदेंची परंपरा देवाभाऊंकडून कायम
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. आम्ही २१०० रुपयेदेखील देणार आहोत. बजेटच्यावेळी त्याचा आम्ही विचार करु. आर्थिक रिसोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. ते करण्याचा आमचा निर्णय पक्का आहे. दिलेली सगळी आश्वासनं आम्ही पूर्ण करु. त्यासाठी करायच्या व्यवस्था आम्ही आधी करु,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा आहे. या छाननीतून काही महिलांना बाद करण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘योजनेच्या निकषात बसत नसताना जर कोणी लाभ घेतला असेल, तर त्याचा विचार करण्यात येईल. निकषात बसणाऱ्या कोणालाही कमी करणार नाही. निकषात बसत नसतानाही काही महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis: मंत्रिपदांसाठी निकष ठरला! फडणवीसांची सूचना; दादांची मान्यता, शिंदेंचा आक्षेप; महायुतीत खटका?
‘मोदींनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना सुरु केली, तेव्हा पहिल्यांदा जे लाभार्थी होते, त्यात काही मोठे शेतकरीदेखील होते. त्यांनाही योजनेचा लाभ मिळत होता. मग त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:हून सांगितलं की आम्ही त्या निकषात बसत नाही. मग ती योजना स्थिर झाली. त्याच प्रकारे या योजनेत काही निकषाच्या बाहेरच्या काही बहिणी सापडल्या, तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार करण्याचा विषय नाही,’ असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.