Maharashtra BJP: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीत बैठकांचं सत्र सुरु आहे. पण खातेवाटपावरुन निर्माण झालेला तिढा सुटलेला नाही.
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं वृत्त पीटीआयनं दोन दिवसांपूर्वी दिलं. फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात भाजपनं नेत्रदीपक विजय मिळवला. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रिपदी मिळेल अशी दाट शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. त्यातील अनेक जण फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
मग ‘ती’ चार खाती आम्हाला द्या! ‘एक्स्चेंज ऑफर’वरुन सेना आक्रमक; भाजपच्या कोंडीचे प्रयत्न
गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मागील सरकारमध्येही या नेत्यांकडे मंत्रिपदं होती. डॉ. विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. त्यांच्या जागी भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देईल.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा मंत्री होते. २०१९ मध्ये पक्षानं त्यांचं तिकीट कापलं. पण यंदा त्यांना पक्षानं संधी दिली. बावनकुळेंना लगेच मंत्रिपद दिलं गेल्यास प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार किंवा राम शिंदे यांच्यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते.
Ajit Pawar: शिंदे रुसले, आता दादाही अडून बसले; दिल्लीत तळ ठोकला, शहांना भेटणार; मागण्यांची जंत्री समोर
सार्वजनिक बांधकाम विभाग सांभाळण्याचा अनुभव असलेले रविंद्र चव्हाण यांना पुन्हा संधी मिळू शकते. ठाण्यात ते एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला चांगलं प्रत्युत्तर देतात. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांना ताकद देईल अशी शक्यता आहे. ठाण्यात त्यांनी पक्षाची चांगली बांधणी केली आहे. विधान परिषदेच्या आमदार असलेल्या पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपद मिळू शकतं. फडणवीस सरकारमध्येही त्या मंत्री होत्या.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
१. रविंद्र चव्हाण, डोंबिवली
२. नितेश राणे, कुडाळ
३. गणेश नाईक, ऐरोली
४. मंगलप्रभात लोढा, मलबार हिल
५. आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
६. राहुल नार्वेकर, कुलाबा
७. अतुल भातखळकर, कांदिवली
८. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा
९. गोपीचंद पडळकर, जत
१०. माधुरी मिसाळ, पर्वती, पुणे
११. राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी
१२. चंद्रशेखर बावनकुळे, कामठी
१३. संजय कुटे- जळगाव जामोद
१४. गिरीश महाजन, जामनेर
१५. जयकुमार रावल, सिंदखेडा
१६. पंकजा मुंडे, विधान परिषद
१७. अतुल सावे, औरंगाबाद पूर्व