Two Days Old New Born Found In Sewer: वन कर्मचारी मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना एका नाल्यात एक नवजात बाळ आढळून आलं. त्यांनी तात्काळ या बाळाला रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गंभीर जखमी झाल्याने या बाळाला मृत्यू झाला.
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ते खुटवाडी रस्त्यावर वनरक्षक प्रियंका वसावे, विनय वसावे पार्वती पाडवी हे तिघेजण सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना तेथील एका नाल्यात दोन दिवसाचे बाळ त्यांना आढळून आले. त्यानंतर तिघांनी त्या नाल्यात उतरून त्या बाळाजवळ गेले असता त्या बाळाच्या कानाजवळ गंभीर जखम त्यांना आढळून आली. त्यानंतर प्रियांका वसावे यांनी तात्काळ अक्कलकुवा पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. कडाक्याच्या थंडीत बाळ असल्याने तसेच त्याच्या कानाला जखम झाल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला गंभीर जखम असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचार साठी नेले असताना उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला.
सध्या नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीत बाळाला उघड्यावर अज्ञात मातेने टाकून दिल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी अज्ञात मातेविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रियांका वसावे वनरक्षक रा. फॉरेस्ट कॉलनी अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कलम ९३ प्रमाणे आज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास वरघुले करीत आहेत. याप्रकरणी पोलीस विभागातर्फे तपास करण्यात येत असून याबाबत काही माहिती असल्यास अक्कलकुवा पोलिसांशी संपर्क साधण्याच्या आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.