• Thu. Jan 2nd, 2025
    शिंदे उप होणार नाहीत, पण ते…; मोदींच्या मंत्र्यांचं विधान, भाईंना मोठं पद मिळणार?

    Ramdas Athawale: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन झालेली नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन झालेली नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेत माझा अडसर नाही. भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असेल असं शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले. तिथून परतल्यावर ते थेट गावी गेले. तिथे शिंदेंनी मुक्काम केल्यामुळे महायुतीच्या बैठका रद्द झाल्या. आता शिंदे ठाण्यात परतले असले तरीही त्यांना बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिंदेंचं नेमकं चाललंय काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदेंची नाराजी स्वाभाविक असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

    ‘सत्ता स्थापनेसाठी मोदी, शहा जो निर्णय घेतील तो मंजूर असेल असं शिंदेंनी आधीच सांगितलं आहे. त्यांची थोडी नाराजी समजू शकतो. भाजपच्या जागा खूप जास्त आल्या आहेत. शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. त्यात त्यांनी खूप चांगलं काम केलं. ते माणूस म्हणूनही चांगले आहेत. मुख्यमंत्रिपदाबद्दल मोदी, शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. शिंदे यांचं नाव जाहीर झालं तर स्वागत करु. फडणवीसांचं नाव निश्चित झाल्यास तेही चांगलंच असेल. भाजपचं नेतृत्त्व निर्णय घेईल, तो निर्णय शिंदे, फडणवीस मान्य करतील,’ असं आठवले म्हणाले.
    Eknath Shinde: गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका
    शिंदे खरोखर नाराज आहेत का, असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला. त्यावर थोडी नाराजी असणं साहजिक आहे. अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. यानंतर भविष्यात पुन्हा अशी संधी मिळणार की नाही याबद्दल त्यांना शंका आहे. थोडी नाराजी आपण समजू शकतो. ते नाराज जरुर आहेत. पण महायुतीचं सरकार स्थापन व्हायला हवं. विकासाच्या अजेंड्यावर आम्हाला काम करायचं आहे. ते स्वत: उपमुख्यमंत्री होणार नाहीत. पण ते महायुतीचे अध्यक्ष होऊ शकतात. आमच्या युतीचं अध्यक्षपद त्यांना दिलं जाऊ शकतं. सरकारवर कमांड ठेवण्याचं काम ते करु शकतात. त्यामुळे त्यांना महायुतीचं अध्यक्षपद द्यायला हवं असं मला वाटतं,’ असं आठवलेंनी म्हटलं.
    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवारांनी सांगितल्या ३ शक्यता
    शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता, याचा पुनरुच्चार आठवलेंनी केला. ‘त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला गेला नव्हता. निवडणूक त्यांच्याच नेतृत्त्वात लढली गेली. पण सरकार पुन्हा आल्यावर तुम्हालाच मुख्यमंत्री करु, असं आश्वासन त्यांना दिलेलं नव्हतं. भाजपला मिळालेल्या जागा पाहता त्यांचाच मुख्यमंत्री होईल. पण नेतृत्त्वानं अद्याप निर्णय घेतलेला नाही. नेतृत्त्वानं कोणाचंही नाव निश्चित केलं तरीही आम्ही त्यांचं स्वागत करु, असं आठवले शेवटी म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed