• Sat. Dec 28th, 2024
    CM पदानंतर आता मंत्रिपदासाठीही चुरस, अजितदादांच्या शिलेदाराचा ८०० फुटावरुन झळकला भलामोठा बॅनर

    Edited byविमल पाटील | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 2 Dec 2024, 4:13 pm

    Ajit Pawar Big Banner Displayed at Nagphani: मावळ विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदु ठरला होता. सर्व पक्ष विरोधात असूनही अजित पवार यांचे शिलेदार असलेले सुनील शेळके यांनी लाखांच्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली. यातच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक पक्षाकडून ताकद लावली जात आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळमधील तरुणांनी ८०० फूटावरुन मोठा बॅनर झळकावला आहे.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घावघवीत यश मिळाले आहे. यात मावळ विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदु ठरला होता. सर्व पक्ष विरोधात असूनही अजित पवार यांचे शिलेदार असलेले सुनील शेळके यांनी लाखांच्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली. आता लवकरच सरकार देखील स्थापन होणार आहे. त्यात मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक पक्षाकडून ताकद लावली जात आहे. यातच ‘अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळके हेच मंत्रीपदाचे खरे दावेदार’ अशा आशयाचा तीस फुटाचा बॅनर मावळमधील तरुणांनी ८०० फूट उंचीच्या नागफणी कठड्यावरून झळकावला आहे.

    यंदाच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावर राज्यभर रंगली आहे. दरम्यान अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात होतच आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याचा मोठा दावा भाजप नेत्याने केला आहे. पण अजित पवार पवारांच्या समर्थकांच्या मनातील इच्छाही आता बळावली आहे. तर दुसरीकडे जायंट किलर ठरलेल्या सुनील शेळकेेंना देखील मंत्रीमंडळात स्थान मिळावे, अशी देखील इच्छा व्यक्त होत आहे.
    Amit Shah : मंत्रिपद हवंय? अमित शाहांची बारीक चाळणी, एकापेक्षा एक आठ निकष; सातवा मुद्दा महायुतीसाठी कळीचा
    नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कडा. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते. परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे. या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.

    आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो. या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात. अशाच सुमारे ८०० फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करीत अजित दादा आणि सुनील शेळकेंचा ३० फुटी मोठा बॅनर झळकावला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed