Nandurbar Crime: अंकलेश्वर महामार्गावरील कॉलेज चौफुली ते चिनोदा चौफुलीदरम्यान असलेल्या हर्षल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये २९ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी एक तरुण मृतावस्थेत परिसरातील नागरिकांना दिसला.
हायलाइट्स:
- तळोदा शहरातील संशयास्पद मृत्यू
- संशयास्पद मृत्यूचा झाला खुलासा
- नंदुरबारमधील धक्कादायक घटना
Nagar News: माझ्या कुटुंबातील चार मतं कुठे गेली? EVMवर शंका व्यक्त करत अपक्ष उमेदवाराचा सवाल
तळोदा येथील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये आढळलेल्या चंद्रकांत जुगार पावरा (वय ४०) यांच्या मृत्यूमागील कारण समोर आले आहे. प्राथमिक तपासानुसार, जातपडताळणीच्या कागदपत्रांच्या वादातून झालेल्या वादाचा परिणाम म्हणून ही हत्या घडली असल्याचे समोर आलं आहे. संशयित आरोपी बंटी गुलाब राहसे (रा.अलवान, ता. तळोदा) आणि मृत चंद्रकांत जुगार यांच्यात जातपडताळणीच्या कागदपत्रांवरून वाद झाला होता. वाद विकोपाला जाऊन आरोपीने लोखंडी पाईपने चंद्रकांत यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रताप जूजाऱ्या पावरा (रा.बिजरी, ता.धडगाव) यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात बंटी गुलाब राहसे याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम १०३(१) आणि ११५(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे करत आहेत.