• Fri. Nov 29th, 2024
    एक चूक नडली, भरधाव कारची जोरदार धडक, रिक्षाचा चेंदामेंदा, चालकाचा जागीच मृत्यू

    | Updated: 29 Nov 2024, 12:32 pm

    Palghar : चारचाकी आणि ऑटोरिक्षाची जबर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला. तर तीन जखमी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पालघर : नायगांव पूर्व येथे, जुन्या महावितरण कार्यालयाच्या परिसरात नायगाव- जुचंद्र मार्गावर चारचाकी आणि ऑटोरिक्षाची जबर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर रिक्षातील दोन प्रवासी व कारचालक जखमी झाले आहेत. संजय बाबुलाल यादव (वय 38) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
    नायगाव पूर्व परिसरात जुचंद्र नायगाव मार्गावर कारचालक भरधाव वेगाने कार घेऊन जात असताना भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नायगांव पूर्व परिसरातील नायगांव – जुचंद्र मार्गावर जुन्या महावितरण कार्यालय परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात रिक्षाचालक संजय बाबूलाल यादव याचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षात मागे बसलेले दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अक्षय कदम आणि सागर सावंत अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. रिक्षा आणि भरधाव कारचा अपघात इतका भीषण होता की कारचालक देखील अपघातात जखमी झाला आहे. अमित पवार (वय 32) असे जखमी कारचलकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
    नायगांव पूर्व येथून जूचंद्र-नायगांव रस्ता जातो. नायगांव येथील उड्डाणपूल सुरू झाल्यापासून या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर वेगावर नियंत्रण न ठेवता वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवू लागले आहेत.

    दरम्यान, नागपूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर किन्ही जवादे फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राळेगाव तालुक्यातील वडकीपासून पाच किलोमिटर अंतरावरील किन्ही जवादे फाट्याजवळ एकेरी वाहतुकीमुळे या दोन वाहनांची टक्कर झाली ज्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed