Who is your new CM? : महाराष्ट्र विधानसभेचे निकाल स्पष्ट होताच महायुतीच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या विजयी आमदारांची स्वतंत्र बैठक होऊ शकते. दरम्यान, यावेळी पुठील मुख्यमंत्र्यांच्या नावावरही निर्णय होऊ शकतो.
हायलाइट्स:
- महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईतून सांगावा
- मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब?
- राज्याच्या राजकारणात खलबतं
Bhor Vidhan Sabha Result : अजित पवारांचा एक निर्णय अन् भोरमध्ये थोपटेंच्या गडाला सुरूंग, ४५ वर्षांनी नेतृत्त्व बदललं
आमदारांच्या स्वतंत्र बैठका होणार
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीतील पक्षांनी आपल्या विजयी आमदारांना मुंबईत येण्याचा सांगावा धाडला आहे. यादरम्यान, सर्व घटक पक्षांच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका पार पडणार आहेत. यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची भाजपच्या वरिष्ठांशी एकत्र बैठक होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री पदावर निर्णय घेण्यात येईल. काल झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गटासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह हालचालींना वेग आला आहे. राज्यात मिळालेल्या घवघवीत यशात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी आता विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून २ निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय भाजपकडून २ निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधिमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.