• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यातील खडकवासला तिरंगी लढतीमध्ये कोण ठरणार जायंट किलर?

    Pune Khadakwasla Vidhan Sabha Election 2024 Result, NCP SP Sachin Dodke vs MNS Mayuresh Wanjale vs BJP Bhimrao Tapkir : पुण्यातील खडकवासला तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पहिल्यांदाच निवडणुकीला उतरलेल्या मुयरेश वांजळे आणि सचिन दोडकेंचाही पराभव झाला. भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. खडकवासला मतदारसंघाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली होती. या मतदारसंघात रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना मनसेने तिकीट दिलं होतं. तर सचिन दोडके यांची २०१९ ला अवघ्या २५९५ मतांनी आमदारकी गेली होती. पुण्यामधील खडकवासला मतदारसंघामध्ये भाजप, शरद पवार गट आणि मनसेमध्ये ही लढत होणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार भीमराप तापकीर, मनसेकडून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे आणि शरद पवार गटाचे सचिन दोडके आमने-सामने होते. भीमराव तापकीर सलग तीनवेळा निवडणुकीमध्ये जिंकून आले होते. तर सचिन दोडके मागील निवडणुकीमध्ये २५९५ मतांनी पराभव झाला होता. तर मयुरेश दोडके यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती मात्र त्यांना पराभवाचा सामना कराना लागला होता.
    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed