Todays Chanakya Exit Poll: टुडे्स चाणक्यचा एक्झिट पोल मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर २४ तासांनी जाहीर झाला असून या पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ शकते. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १७५ जागा मिळतील असा अंदाज आहे. या अंदाजात ११ जागा कमी जास्त होऊ शकतात. तर महाविकास आघाडीला १०० (११ जागा कमी जास्त) जागा मिळतील. अन्यला १३ जागा (५ जागा कमी जास्त) मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीला ४५ टक्के, महाविकास आघाडीला ३९ टक्के तर अन्यला १६ टक्के मते मिळण्याची शक्यता चाणक्यने व्यक्त केली आहे.
पोल्स ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला १५५ जागा मिळतील. म्हणजे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १२२ जागांवर समाधान मानावे लागले. २८८ पैकी ११ जागा या अन्यला मिळतील असा पोल्स ऑफ पोलचा अंदाज आहे. अन्य सर्व संस्थांनी एक्झिट पोल कालच म्हणजे मतदान झाल्यानंतर जाहीर केले होते. चाणक्यने मात्र महाराष्ट्राचे एक्झिट पोल आज जाहीर केले आहेत.
अजित पवार किंग मेकर! या तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा दावा
आता २३ तारखेला एक्झिट पोल बरोबर येतात की लोकसभा निवडणूक २०२४ आणि हरियाणा विधासभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा त्यांचे अंदाज चुकणार हे स्पष्ट होईल. राज्यातील अनेक मतदारसंघात यावेळी विक्रमी मतदान झाले आहे. त्यामुळे हे मतदान सत्ताधाऱ्यांना फायद्याचे ठरणार की त्यांची विकेट पडणार याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. काहींच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांनाही बहुमत मिळणार नाही आणि अपक्ष तसेच बंडखोर यांच्या हातात सत्तेच्या चाव्या असतील.