विरारमधील विवांता हॉटेल पुन्हा चर्चेत आलं आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला पैसे वाटत असताना पकडलं. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला यथेच्छ मारहाण केली.
तावडे पाच कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याचं मला भाजपच्याच लोकांना सांगितलं होतं, असा दावा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी एकच खळबळ उडवून दिली. तावडेंना हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून बरेच प्रयत्न सुरु होते. पण बविआचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नव्हते. तावडेंच्या जवळ असलेल्या बॅगेतील पैसे त्यांनी काढून दाखवले. अखेर सहा तासांनंतर तणाव निवळला. तावडेंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानं ठाकूर यांनी त्यांनी स्वत:च्या कारमधून सुरक्षित ठिकाणी सोडलं. तिथून ते मुंबईला रवाना झाले.
Vinod Tawde: भाजपमधील कोणच्या नेत्यानं टिप दिली? तावडेंचा आवाज चढला; दोन वाक्यांत विषय संपवला
तावडे आणि बविआचे कार्यकर्ते यांच्यामधील खडाजंगी ताजी असताना बविआच्या कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या तालुकाप्रमुखाला मारहाण केली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख सुदेश चौधरींनी विवांता हॉटेलात बेदम चोप देण्यात आला. पैसे वाटप करत असल्याच्या आरोपावरुन बविआच्या कार्यकर्त्यांनी चौधरींनी बेदम मारलं.
Rahul Gandhi: मोदीजी, तुम्हाला ५ कोटी टेम्पोतून कोणी पाठवले? तावडे तावडीत सापडताच राहुल गांधींचा थेट सवाल
तावडेंचे २५ फोन; ठाकूर यांचा दावा
विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपच्याच लोकांनी दिल्याचा सनसनाटी दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. ‘तावडेंसारखा राष्ट्रीय स्तरावरील नेता पैसे वाटप करणार नाही असं मला वाटत होतं. पण जेव्हा हॉटेलवर पोहोचलो, तेव्हा तिथे तावडे आणि पैसे दोन्ही सापडले. कार्यकर्त्यांनी थांबवून ठेवल्यावर तावडेंनी मला २५ फोन केले. मला माफ करा. मला जाऊ द्या, अशा शब्दांत त्यांनी माझ्याकडे गयावया केली,’ असा दावा ठाकूर यांनी केला.