• Tue. Nov 19th, 2024
    मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्हाप्रमुखाने समर्थकांसह शिंदे गटात केला प्रवेश

    Jalgaon News: राज्यातील विधासभेचे मतदान काही तासांनी होणार आहे. त्याआधी जळगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेाल मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुखांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जळगाव: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून राजकीय दृष्ट्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या समर्थकांसह आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हा प्रवेश सोहळा झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

    विष्णू भंगाळे यांचा सोबत ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. विष्णू भंगाळे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे तर भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांची बाजू आता अधिक भक्कम झाली आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, शिवसेना आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

    शिवसेना शिंदे गट वेगळा झाला त्यावेळी विष्णू भंगाळे यांनी ठाम बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात राहणार असा दावा केला होता. मात्र अडीच वर्षातच विष्णू भंगाळे यांना पक्षातूनच वेळोवेळी डावलले जात होते. या जळगाव शहरातून शिवसेना ठाकरे गटा तर्फे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून जयश्री महाजन यांना उमेदवारी देण्यात आल्याने विष्णू भंगाळे नाराज होते कुठेही ते प्रचारात सहभागी दिसले नाही.

    विष्णू भंगाळे हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून जळगाव शहराच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी एकदा जळगाव शहराचे महापौरपद देखील भूषवलेले आहे. या प्रवेशामुळे या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जयश्री महाजन यांना मोठा धक्का बसणार आहे. भांगळे यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि समर्थक देखील शिंदे गटात आल्याने त्याचा उद्या होणाऱ्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *