राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी अदानींना धारावीसह अनेक जमिनी दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यातील सरकार नोकऱ्या चोरी करत असल्याचा थेट राज्य सरकारवर राहुल गांधीकडून आरोप करण्यात आला. धारावीबद्दल बोलतानाही राहुल गांधी दिसले.
राहुल गांधी यांनी तिजोरीमधून दोन पोस्टर काढली. यामधील एका पोस्टवर नरेंद्र मोदी आणि अदानी हे दोघे दिसले. राहुल गांधी यांनी काढलेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये मुंबईची धारावी दिसली. यासोबतच राहुल गांधी यांनी म्हटले की, धारावी आणि सर्व विमानतळे अदानी यांना दिली आहेत. धारावीच्या मुद्दावर बोलताना राहुल गांधी हे दिसले आहेत. राज्यातील सरकार नोकऱ्या चोरी करत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले.
Eknath Shinde : राज ठाकरेंसोबत कम्युनिकेशन गॅप पडलाय, एकनाथ शिंदेंची कबुली; म्हणाले, शेवटी तेही…मोदींसोबतच राज्य सरकारवर राहुल गांधींनी आरोप केले. अदानी यांना फुल सपोर्ट नरेंद्र मोदी यांचा असल्याचे परत परत म्हणताना राहुल गांधी दिसले. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे खूप जुने संबंध आहेत. फक्त विषय धारावीचाच नाही तर अनेक जमिनी नरेंद्र मोदी यांनी अदानी यांना दिल्या आहेत. सरकारमुळे 5 लाख युवकांचा रोजगार गेला, हा गंभीर आरोप राज्य सरकारवर राहुल गांधी यांनी लावला.
एक है तो ‘सेफ’ है! राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत तिजोरी आणली, मोदींचा ‘तो’ फोटो बाहेर काढला
7 लाख कोटींचे रोजगार राज्याच्या बाहेर गेल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नाऱ्याची खिल्ली उडवताना राहुल गांधी दिसले. महाराष्ट्राची निवडणूक ही विचारधारेवर असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या विधानासी पूर्णपणे सहमत असल्याचे शेवटी बोलताना राहुल गांधी हे दिसले.