Sharad Pawar: समाजकारण आणि राजकारणात सुसंवाद फार महत्त्वाचा असतो असे सांगत शरद पवारांनी देशाचे संरक्षण मंत्री झाल्यावर आपण काय केले हे सांगितले. एखाद्या विषय समजून घेण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांकडून माहिती घेण्यात काहीच कमीपणा नसतो असे ते म्हणाले.
बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी इतक्या वर्षात अनेक लोकं सोडून गेलीत तरी देखील तुम्ही निराश न होता काम करता या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले- लोकांकडून ही उर्जा मिळते. समाजकारणात, राजकारणात सुसंवाद ठेवणे हे फार महत्त्वाचे असते. मी शक्यतो गाडीने प्रवास करतो. कारण त्यामुळे रस्ते कसे जोडता येतील, आजूबाजूची पिके कशी आहेत हे कळते आणि लोकांशी संवाद साधता येतो. त्यामुळे ग्राउंड लेव्हलची परिस्थिती चांगली समजण्यास मदत होते.
मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर त्याची नोंद का घ्या; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
संरक्षण मंत्री झाल्यावर तातडीने कोल्हापूर गाठले
या मुलाखतीत शरद पवारांनी एक आठवण सांगितली. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नसेल तर त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी बोलून आपल्याला माहिती घेता येते आणि त्यात कमीपणा काहीच नसतो. मी जेव्हा देशाचा संरक्षण मंत्री झालो. शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांचे ब्रिफिंग झाले. संरक्षण मंत्री झाल्यावर माझ्या समोर अनेक प्रश्न होते ज्याची मला नीट माहिती नव्हती. मी राज्यात मुख्यमंत्री होतो आणि अचानक संरक्षण मंत्री झालो.
अजित पवारांविरुद्ध उमेदवार का दिला? स्वत:च्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील? शरद पवारांनी थेट संख्याच सांगितली
त्यावेळी मी तातडीने कोल्हापूरला गेलो. तेथे भारतीय लष्करातून निवृत्त झालेले जनरल थोरात यांची भेट घेतली. दोन दिवस त्यांना भेटून एका विद्यार्थ्यासारखे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्या दोन दिवसात मी त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून विषय समजून घ्यायचो. संरक्षण मंत्री म्हणून मी त्यांचा बॉस होतो. पण संरक्षण क्षेत्रातील त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त होते. आपल्यापेक्षा ज्याला जास्त कळते त्याच्याकडून समजून घेण्यात काही कमीपणा नाही. हा संवाद ठेवणे गरजेचे आहे. मी जनरल थोरात यांच्यासोबत दोन दिवस घालवले त्याचा उपयोग मला प्रशासनात झाला असल्याचे शरद पवार म्हणाले.