• Thu. Nov 14th, 2024

    ‘दादाच किंगमेकर’ ठरणार म्हणणाऱ्या नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, अजित पवारांचीही डोकेदुखी वाढली

    ‘दादाच किंगमेकर’ ठरणार म्हणणाऱ्या नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, अजित पवारांचीही डोकेदुखी वाढली

    | Updated: 12 Nov 2024, 1:14 pm

    Nawab Malik : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना नवाब मलिक यांना मोठा झटका बसला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले असताना मलिकांना पुन्हा एकदा ईडीने धक्का दिलाय. अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीनंतर अजित दादा किंगमेकर ठरणार असल्याचं मलिक म्हणाले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मलिकांनी अनेकवेळा हे विधान केले होते. अशातच नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल करत त्यांना मोठा धक्का दिलाय. मात्र ईडीने मलिकांविरोधात याचिका का दाखल केली जाणून घ्या.

    नवाब मलिक यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. परंतु तो जामीन रद्द करून नियमित जामिनासाठी मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली ती फेटाळून लावावी, अशी मागणी ईडीकडून हाय कोर्टात करण्यात आलेली आहे.Sanjay Raut : ‘राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर बोलताना…’; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
    सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना वैद्यकिय जामीन देताना स्पष्ट केलेलं होतं की, हा जामीन फक्त वैद्यकिय उपचारासाठी असेल पण मलिक विधानसभा निवडणुकीमध्ये उतरले असून ते जोमाने प्रचार करत असून माध्यमांना मुलाखतही देत आहेत. आपले अवयव निकामी झाले असून तातडीच्या उपचाराची गरज आहे, असा दावा मलिकांनी केला होता. उच्च न्यायालयात मलिकांच्या जामिनासाठीची याचिका प्रलंबित असेपर्यंत म्हणजेच उच्च न्यायालय यावर जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत हा जामीन कायम राहिल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. आता मलिकांची प्रकृती पाहता त्यांना वैद्यकिय जामिनाची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या जामिनाचा ते गैरवापर करण्यात आला असा दावा ईडीने केला आहे.
    Trumpet Election Symbol : तोच खेळ पुन्हा? ३२ मतदारसंघांत ट्रम्पेट, तुतारी वाजवणाऱ्या माणसाशी कुठे कुठे सामना?
    दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिक उतरले असून मानखुर्द शिवाजीनगरमधून ते निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांची मुलगी सना मलिक अणुशक्तीनगर या मतदारसंघातून उतरली आहे. मात्र आता ईडीने दाखल केलेल्या याचिकेमुळे लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. महायुती त्यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं असलं तरी दादांनी मलिकांना तिकीट दिले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed