• Wed. Nov 13th, 2024
    लढाई सासू-सुनेची; चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर भावासाठी, तर सासू वत्सला या लेकासाठी आमनेसामने

    Chandrapur Vidhan Sabha Nivadnuk: सध्या चंद्रपुरात सासू विरुद्ध सून असं चित्र दिसत आहे. येथे खासदार प्रतिभा धानोरकर या भावासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर, त्यांच्या विरोधात सासू वत्सला या मुलगा अनिल धानोरकर यांच्यासाठी प्रचार करत आहेत.

    Lipi

    निलेश झाडे, चंद्रपूर: खरंतर राजकीय लढाई ही वेगवेगळ्या पक्षांची असते. कधी कधी राजकारण घरात शिरतेयं आणि घरातील माणसं एकमेकांच्या विरोधात उभे होत असतात. वरोरा मतदारसंघात सध्या असं चित्र दिसू लागलंय. एकीकडे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आपले भाऊ प्रवीण काकडे यांच्या प्रचार करताना दिसत आहेत. दुसरीकडे, त्यांचा सासू मोठा मुलगा अनिल धानोरकर यांचा प्रचारात व्यस्त आहेत. या कौटुंबिक लढाईत कोण पुढे जातयं याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    ऐन निवडणुकीच्या धामधूमीत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई धानोरकर यांनी माझ्या मुलाचा घातपात झाला, अशी शंका उपस्थित करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सून आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही आरोप केले आहेत.
    BJP Manifesto: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय?
    आपल्या मोठ्या मुलाचा प्रचार करताना त्या मतदारसंघात दिसत आहेत. त्यांच्या मोठा मुलगा अनिल धानोरकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. ते भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. त्यांनी विधानसभा लढाविण्याची तयारी केली होती. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी खासदार धानोरकर भावाच्या पाठीशी उभे राहतात की दिराच्या याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.

    शेवटी खासदार धानोरकर भावाचा पाठिशी उभ्या राहिल्या आहे. त्यांचे भाऊ प्रवीण काकडे काँग्रेसचे वरोरा मतदार संघातील उमेदवार आहेत. खासदार धानोरकर यांचा निर्णय त्यांच्या सासूंना पटलेला दिसत नाही. त्या नाराज आहेत. कदाचित त्यामुळे त्यांनी मोठ्या मुलाचा प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

    Pratibha Dhanorkar: लढाई सासू-सुनेची; चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर भावासाठी, तर सासू वत्सला या लेकासाठी आमनेसामने

    सासू आणि सून एकमेकांच्या विरोधात उभ्या झाल्याचं चित्र या मतदारसंघात दिसत आहे. आता यात कोण सरस ठरले हे येत्या काही दिवसात कळणार आहे. मात्र, बाळू धानोरकर यांच्या आई प्रचारात उतरल्याने अनिल धानोरकर यांना सहानुभूती मिळत असल्याचे चित्र वरोरा मतदारसंघात दिसत आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरे गटाचे मुकेश जिवतोडे, भाजपचे अहेतेश्याम अली यांनी बंडखोरी केलेली आहे. याचा फटका महायुती, महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed