• Sat. Sep 21st, 2024
गुढीपाडव्याचं प्रसन्न वातावरण, आमचे नानाभाऊ मान डोलावतायत, संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत मंचावर उपस्थित होते. सुरुवातीची सूत्रं संजय राऊत यांनी हाती घेतली होती. त्यावेळी राऊतांनी नाना पटोलेंना मिश्किलपणे टिचक्या मारल्या. त्यानंतर पटोलेंनीही तितक्याच गमतीने वचपा काढला.

संजय राऊत यांनी सुरुवातीला व्यासपीठावरील नेत्यांची ओळख करुन दिली. तसंच महाविकास आघाडीत समाविष्ट पक्ष आणि संघटनांची नावंही सांगितली. “वातावरण तर पाहताय आपण आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी… अत्यंत प्रसन्न आणि आनंददायी.. ” असं संजय राऊत म्हणत असतानाच पटोलेंनी मान डोलावली. हा धागा पकडत “नाना पटोले मान हलवत आहेत आमचे..” असं राऊत मिश्किलपणे म्हणाले. राऊतांनी अचानक केलेली टिपण्णी ऐकून पटोलेंसह मंचावरील कोणालाच हसू आवरता आलं नाही.

विशेष म्हणजे कोणत्या जागा कुठला पक्ष लढवणार, हे सांगण्याची जबाबदारी जेव्हा संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली, तेव्हा नानांनी ‘महाविकास आघाडीचे ग्रँड प्रवक्ते’ असं म्हणत राऊतांना चिमटा काढला.
पवारांना पाडण्याची भाषा मवाळ, शिवतारे सुनेत्रांच्या भेटीस, पुरंदरमधून ५० हजारांच्या लीडचं वचन
सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. संजय राऊत यांनी मुद्दामहून जागांचे वाचन करताना सांगली आणि भिवंडी यांच्यावर जोर देऊन दोनदा नाव उच्चारले. काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस १०, तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागा लढवणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र

काँग्रेस – (१७ जागा)
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई
काँग्रेसला धक्क्यावर धक्के, प्रवक्ते राजू वाघमारेंच्या हाती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा
राष्ट्रवादी काँग्रेस (१० जागा)
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड

जनता हीच सर्वश्रेष्ठ हे सगळ्या राजकीय पक्षांना मानावं लागेल; राजू शेट्टींनी निवडणुकीचा निकाल सांगितला

शिवसेना (२१ जागा)
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed