• Mon. Nov 25th, 2024
    तरुण एकटक पाहत बसल्याने वाद, मित्राच्या मदतीने तरुणी नको ते करुन बसल्या

    अविनाश महाजन, नागपूर : नागपुरात एका वादातून हत्येची घटना घडली आहे. टोमणे मारण्यासह एकटक बघितल्याने चाकूने वार करून युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन तरुणींसह तिघांना अटक केली. हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणींविरुद्धची ही अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई आहे.रणजित बाबुराव राठोड (वय २८, रा. ज्ञानेश्वरनगर) असे मृतकाचे नाव आहे. अटकेतील मारेकऱ्यांमध्ये आकाश दिनेश राऊत (वय २५, रा.हसनबाग), जयश्री दीपक पानझाडे (वय २४) आणि सविता सायरे (वय २४, दोन्ही रा. वाडी) यांचा समावेश आहे.
    आतून दार बंद, मैत्रिणीने मागच्या दरवाजातून डोकावलं आणि समोर भयंकर दृष्य; २२ वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
    रणजितचे किराणा दुकान असून तो कापडाचाही व्यवसाय करायचा. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास रणजित हा महालक्ष्मीनगरमधील पान ठेल्यावर आला. याचदरम्यान कापड खरेदी करुन परत जाताना जयश्री आणि सविताही पान ठेल्यावर थांबल्या. रणजित हा त्यांना एकटक बघायला लागला. त्याने टोमणे मारले. दोघींनी त्याला जाब विचारला. यावरुन त्यांच्यात वाद झाला.
    पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने परिस्थितीसमोर हात टेकले, आयुष्याचा दोर कापण्याचा कटू निर्णय, चिमुकली पोरकी
    जयश्रीने तिच्या ओळखीचा आकाश याच्या मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जयश्रीच्या फोननंतर आकाश तेथे आला. त्याने रणजितसोबत वाद घातला. त्यानंतर चाकूने त्याच्या पोटावर आणि छातीवर वार केले. रणजित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर आकाश, जयश्री आणि सविता पसार झाले.

    मोकाट वळूंच्या झुंजीत नागपुरात अनेक वाहनांचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत

    घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी रणजितचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.
    पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन दोन तरुणींसह तिघांना अटक केली. आज, सोमवारी तिघांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात येईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed