• Sat. Sep 21st, 2024
अजितदादांच्या राष्ट्रवादीची नवनीत राणांना तंबी, फोटो काढा अन्यथा कारवाई अटळ, नेत्यांचा इशारा

अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वारे सक्रिय झाले आहेत. आरोप प्रत्यारोपानंतर डू अँड डोन्ट अशा प्रकारचे सल्ले आता राजकीय नेते एकमेकांना देऊ लागले आहेत. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे या महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचा फोटो खासदार नवनीत राणा यांनी न विचारता पोस्टरवर लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने थेट त्यांना फोटो काढण्याची तंबी देण्यात आली आहे. अन्यथा कारवाई करू, असा इशाराही देण्यात आल्याने आल्याचे पत्रात समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांचे भाजपसोबत छुपे संबंध, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. असाच खासदार नवनीत राणा यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून तयारी सुरू केली असताना त्यांनी आपल्या प्रचार बॅनरवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते संजय खोडके यांचा फोटो वापरला. याच पार्श्वभूमीवर आज संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना पत्र लिहून परवानगी शिवाय फोटो वापरला कसा हा प्रश्न विचारत तात्काळ सर्व बॅनर वरून फोटो हटवण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारवाई करणार असल्याचे सुद्धा त्यांनी पत्रात म्हटले आहे.महाराष्ट्र टाइम्स सोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके म्हणाले की, आम्ही महायुतीचा घटक असलो तरी कुणी माझा फोटो वापरावा किंवा वापरू नये हा माझ्या वैयक्तिक प्रश्न आहे. संबंधित उमेदवारांनी मला कुठलीही विचार न करता फोटो वापरला त्यामुळे आज आम्ही त्यांना तो काढण्याची सूचना दिल्या आहे. २०१९च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी बुलढाणा जिल्ह्यात निरीक्षक म्हणून होतो. २०२४च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी पक्षाला अशाच पद्धतीची जबाबदारी मागितली आहे. त्यामुळे मी अमरावती जिल्ह्यात कोणाचाही प्रचार करणार नाही.

प्रवीण परदेशींनी किल्लारी भूकंपात जे काम केलं त्याने धाराशीव लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत आलंय

कोण आहेत संजय खोडके ?

अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ व संयमी राजकारणी म्हणून संजय खोडके परिचित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासकीय सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. अमरावती विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचे ते पती आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सुज्ञ अभ्यासू व दूरदृष्टीचा राजकीय नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed