• Mon. Nov 25th, 2024

    Breaking News: अमरावतीत बच्चू कडूंचा महायुतीला धक्का; ‘प्रहार’ मधून दिनेश बुब यांना उमेदवारी

    Breaking News: अमरावतीत बच्चू कडूंचा महायुतीला धक्का; ‘प्रहार’ मधून दिनेश बुब यांना उमेदवारी

    अमरावती (जयंत सोनोने): भारतातील हाय व्होल्टेज मतदार संघापैकी सदैव चर्चेत असणाऱ्या अमरावती एक मतदार संघात आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर केला. बच्चू कडूंनी उमेदवार जाहीर केल्याने भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसमधील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

    सत्तांतरणाच्या काळात प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांचा हात सोडत एकनाथ शिंदे सोबत संधान साधले होते. दरम्यान बच्चू कडू यांना अपंग कल्याण मंत्रालय व राज्यमंत्री पदाचा दर्जा सुद्धा देण्यात आला होता. या काळात एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांना भरघोस निधी दिला.

    अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यामधील वाद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त करत, आम्ही महायुतीतून बाहेर पडलो नसलो तरी अमरावतीत आम्ही राणांच्या विरोधात भूमिका घेत असल्याची त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.

    आज प्रहार पक्षाचे नेते आमदार राजकुमार पटेल बल्लू जवंजाळ यांच्या उपस्थितीत अमरावती येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले दिनेश बुक यांना प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

    महायुती सध्या एक हिंदुत्ववादी चेहरा घेऊन राज्यभर प्रचार करत असताना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी हिंदुत्ववादी चेहरा हेरत दिनेश बूब यांना अमरावती ते उमेदवारी जाहीर केली. जुने शिवसैनिक सतत रक्तदान व रुग्णांच्या सोबत काम करणारे राजकीय नेते म्हणून दिनेश भाऊ परिचित आहेत.बच्चू कडू यांच्या या खेळीमुळे महायुती मधील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed