• Sat. Mar 7th, 2026

    ना ओटीपी, ना लिंक तरी खात्यातून पैसे गायब; नागपुरातील महिलेला लाखाचा गंडा, काय घडलं?

    ना ओटीपी, ना लिंक तरी खात्यातून पैसे गायब; नागपुरातील महिलेला लाखाचा गंडा, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही प्रकारचा फेक कॉल आला नाही. कोणतीही लिंक आली नाही. तसेच बँक खातेधारकाने कोणताही ओटीपी शेअर केला नाही. तरीही एका महिलेच्या खात्यातून तब्बल ९९ हजार ९९९ रुपये गायब झाले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    या प्रकरणी जयश्री ज्ञानेश्वर भराडे (वय ३४, रा. पहाडसिंगपूरा, आदर्शनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री भराडे यांनी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी त्यांचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना, त्यांना एक मॅसेज आला. बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यासोबत जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर हा मॅसेज होता. या मॅसेजमध्ये ९९९ रुपये डेबिट झाल्याची माहिती यामध्ये देण्यात आली. ९९९ रुपये गेले कुठे? याची तपासणी केली असता, त्यांच्या खात्यातून ९९९ रूपयांसह ९९ हजार रुपये डेबीट झाल्याची माहिती समोर आली. पोलिस निरीक्षक मंगेश जगताप तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed