• Mon. Nov 25th, 2024
    रेल्वेप्रवाशांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून ‘या’ मार्गांवर धावणार समर स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे एक एप्रिलपासून विशेष रेल्वे सुरू करणार आहे. सप्ताहातून एक व दोन दिवस या गाड्या सुरू होणार असून, उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

    – तीन एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर बुधवारी : मुंबई एलटीटी-बनारस (०१०५३) साप्ताहिक विशेष गाडी. एकूण १३ फेऱ्या. ही गाडी एलटीटीहून १२.१५ वाजता सुटेल.

    – ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर गुरुवारी : बनारस- एलटीटी (०१०५४) गाडी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल. थांबा : कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, वाराणसी आदी.

    – १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर सोमवारी आणि शनिवारी : एलटीटी-दानापूर (०१४०९) द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या. मुंबई एलटीटीहून ही गाडी १२.१५ वाजता सुटेल.

    – २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत मंगळवार आणि रविवारी : दानापूर- एलटीटी द्विसाप्ताहिक विशेष (०१४१०) गाडी दानापूर येथून १८.१५ वाजता सुटेल. थांबा : कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा आदी

    – ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी : एलटीटी-समस्तीपूर साप्ताहिक विशेष (०१०४३) गाडीच्या १३ फेऱ्या. ही गाडी एलटीटीहून १२.१५ वाजता सुटेल.

    – ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी : समस्तीपूर-एलटीटी (०१०४४) गाडी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल. थांबा : कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पाटलीपुत्र आदी.
    नाशिकमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार…! ‘गोदान’च्या बोगीत अग्नितांडव, दिव्यांगांनी घेतल्या उड्या, काय घडलं?
    – २ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी : एलटीटी-प्रयागराज साप्ताहिक विशेष (०१०४५) गाडीच्या १३ फेऱ्या. एलटीटीहून १२.१५ वाजता सुटेल.

    – ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर बुधवारी : प्रयागराज- एलटीटी (०१०४६) गाडी प्रयागराज येथून १८.५० वाजता सुटेल. थांबा : कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी आदी.

    – ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शुक्रवारी : एलटीटी-गोरखपूर साप्ताहिक विशेष (०११२३) गाडीच्या १३ फेऱ्या. एलटीटीहून १२.१५ वाजता सुटेल.

    – ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर शनिवारी : गोरखपूर- एलटीटी (०११२४) गाडी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल. थांबा : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ आदी.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *