• Sat. Sep 21st, 2024
भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रूपवते नाराज, बंडखोरी करणार असल्याची चर्चा

मोबीन खान, शिर्डी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जाहीर झाले आहे. त्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली असून मविआकडून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते नाराज झाल्या आहे. त्यामुळे ठाकरेंच्या भाऊसाहेबांपुढे महायुतीच्या उमेदवारासह महाविकास आघाडीतील बंडखोराचे देखील आव्हान असणार का? याबाबत चर्चा रंगत आहे.
उदयनराजे तहात जिंकले, पुष्पवृष्टीसाठी २५ जेसीबींचे बुकिंग, हारतुऱ्यांची ऑर्डर, साताऱ्यात दणक्यात स्वागत
शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर गेल्या तीन निवडणुकीत युतीकडून शिवसेना आणि आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजकारणाचे समीकरण बदलले. महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यामुळे शिर्डीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती. आज ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते नाराज असल्याचे बोलले जात असून आगामी काळात बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे.

शिवतारे वैफल्यग्रस्त, या निवडणुकीत त्यांचं डिपॉजिटही वाचणार नाही | अमोल मिटकरी

भाऊसाहेब वाकचौरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होताच महिला आयोगाच्या सदस्या तथा काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रूपवतेंनी समाज माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल केली. यात त्यांनी म्हटले आहे की, “काळ कसोटीचा आहे पण काळाला सांगा, हा वारसा संघर्षाचा आहे,” अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केली असून त्यांच्या पोस्टरवरून काँग्रेस नेतेही गायब झाले आहे. उत्कर्षा रुपवते इतर पक्षाकडून प्रयत्न करत असून उत्कर्षांची बंडखोरी भाऊसाहेबांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed