• Mon. Nov 25th, 2024

    शाहू महाराज-उद्धव ठाकरेंच्या भेटीत संभाजी राजे यांची मात्र अनुपस्थिती चर्चा राज्यभरात; समोर आले कारण

    शाहू महाराज-उद्धव ठाकरेंच्या भेटीत संभाजी राजे यांची मात्र अनुपस्थिती चर्चा राज्यभरात; समोर आले  कारण

    कोल्हापूर: यंदा लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर येत नवीन राजवाडा येथे शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोघांमध्ये खलबत देखील झाली. यावेळी स्वतः श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होते. मात्र या भेटीदरम्यान माजी खासदार संभाजीराजे यांची अनुपस्थित असल्याच समोर आले आणि चर्चांना उधाण आले. मात्र संभाजीराजे यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडे विचारणा केली असता संभाजीराजे नियोजित दौऱ्यासाठी राधानगरी परिसरात कार्यकर्ता मेळाव्याला सांगितले आहे.

    नियोजित प्रचारासाठी संभाजीराजे दौऱ्यात

    शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पाठिंबावर संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठान सोबत चर्चा सुरू असल्याच्या देखील त्यांनी म्हटलं होत. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आणले आणि या नावाला महाविकास आघाडी मधून सर्वच नेत्यांची सहमती मिळाल्याने काँग्रेसने ही जागा आपल्याकडे घेत शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली मात्र आपण शाहू महाराजांचं पाठीशी ठामपणे उभे असल्याचे म्हणत ताकतीने वडिलांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

    प्रचारात संभाजीराजे आघाडीवर

    संभाजीराजे छत्रपती यांनी या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आपण शाहू महाराज यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला देखील सुरुवात केली. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आजरा, चंदगड , गडहिंग्लज या विधानसभा मतदारसंघात जाऊन मतदारांचे भेटीगाठी घेत कार्यकर्त्यांना ॲक्टिव केले आहे. तर आता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात आपला प्रचार दौरा सुरू केला आहे. यामुळे संभाजीराजे सध्या शाहू महाराजांच्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच ते आज ठाकरेंच्या भेटी दरम्यान देखील अनुपस्थित राहिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed