• Tue. Sep 15th, 2026

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा समावेश; कोल्हापूर-शाहू महाराज, पुणे-धंगेकर, सोलापूरातून प्रणिती शिंदे

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा समावेश; कोल्हापूर-शाहू महाराज, पुणे-धंगेकर, सोलापूरातून प्रणिती शिंदे

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. यात कोल्हापूर, सोलापूर,नांदेड, लातूर, पुणे, नंदुरबार आणि अमरावती या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील जाहीर केलेल्या सात मतदारसंघातील चार मतदारसंघ हे आरक्षित आहेत. यात नंदूरबार,अमरावती, सोलापूर आणि लातूरचा समावेश आहे.

काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी
कोल्हापूर- शाहू महाराज
पुणे- रविंद्र धंगेकर
नंदुरबार- गोवाल पाडवी
सोलापूर- प्रणिती शिंदे
लातूर- शिवाजी कालगे
नांदेड- वसंत चव्हाण
अमरावती- बळवंत वानखेडे

काँग्रेसने गुरुवारी ५७ जणांची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील ७, गुजरातमधील ११, कर्नाटकमधील १७, राजस्थानमधील ६, तेलंगणामधील ५, पश्चिम बंगालमधील ८, आंध्र प्रदेशमधील २ तर पँडेचेरीमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील या मतदारसंघातील लढती स्पष्ट
नंदूरबार- हीना गावित विरुद्ध जी.के पाडवी
पुणे- मुरलीधर मोहोळ विरुद्ध रविंद्र धंगेकर
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंत चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed