• Wed. Sep 16th, 2026

उमरखेड खंड एकमधील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती

ByMH LIVE NEWS

Mar 21, 2024
उमरखेड खंड एकमधील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : पृथ्वी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या नोंदीनुसार दिनांक २१ मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ८ मिनीटांनी व ६ वाजून १९ मिनीटांनी अनुक्रमे ४.५ रिस्टर स्केल व ३.६ रिस्टर स्केल भुकंपाची नोंद झाली आहे.

लुका स्तरावरील प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागात सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त असून कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed