• Sat. Sep 21st, 2024

युतीत मनसेची एंट्री, शिंदेसेनेला धडकी; अनेकांची धाकधूक वाढली, स्वप्नांवर ‘इंजिन’ फिरणार?

युतीत मनसेची एंट्री, शिंदेसेनेला धडकी; अनेकांची धाकधूक वाढली, स्वप्नांवर ‘इंजिन’ फिरणार?

ठाणे: महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपात चौथा भिडू दाखल झाला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ठाणे, कल्याणमध्ये सेनेचे अनेक नेते मनसेमुळे अस्वस्थ आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेनं १ लाख ७० हजार मतं मिळवली होती. ही मतं महायुतीच्या पारड्यात जाणार का याबद्दल उत्सुकता असेल.

मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसेचा केवळ एकमेव उमेदवार निवडून आला. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील निवडून आले होते. या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास शिवसेनेतील अनेक जण उत्सुक होते. आता मनसे महायुतीत येत असल्यानं त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. रमेश म्हात्रे, राजेश मोरे, रमाकांत मढवी, महेश पाटील, दीपेश म्हात्रे, राजेश कदम यांच्यासह अनेकांना कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्यांनी मतदारसंघात कामं सुरू केली आहेत. पण मनसे महायुतीत आल्यास त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फिरणार आहे.
शिवतारेंना आवरा, अन्यथा आम्ही…; राष्ट्रवादीचा शिंदेंना निर्वाणीचा इशारा, महायुतीत ठिणगी
ठाण्यात मनसेची किती ताकद?
ठाणे लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये मनसेच्या अभिजीत पानसेंनी निवडणूक लढवली. त्यांना ४८ हजार ८६३ मतं मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मतं वाढली. २०१९ मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली नाही. पण राज यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपविरोधात प्रचार केला. त्यामुळे राष्ट्रवादीनं मनसेला विधानसभेला खुलेआम मदत केली. शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनीदेखील युतीधर्म मोडच मनसेला छुपी मदत केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे ठाण्यात भाजपच्या संजय केळकरांविरोधात लढणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधवांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
दोन पक्ष फोडून आलो! फडणवीस जोशात म्हणाले; शहांच्या दाव्यानं आपल्याच नेत्याला तोंडघशी पाडले?
ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये काय स्थिती?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर अशा सहा मतदारसंघांमध्ये मिळून मनसेनं एकूण १ लाख ७० हजार मतं घेतली होती. ठाण्यात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव ७२,८७४ मतांसह दुसऱ्या स्थानी होते. कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, बेलापूरमध्ये मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. मीरा-भाईंदर, ऐरोलीत मनसेचे उमेदवार पिछाडीवर राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed