• Mon. Nov 25th, 2024

    आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही, भाजपच्या टीकेवर मंडलिकांचं उत्तर

    आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही, भाजपच्या टीकेवर मंडलिकांचं उत्तर

    नयन यादवाड, कोल्हापूर: संग्रामसिंह कुपेकर हे मागील अडीच वर्षांच्या काळात आम्ही महायुतीत एकत्र असल्यापासून कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत. त्यांनी विकासकामांबाबत माझ्यावर केलेले आरोप हे दुर्देवी असून त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून शेताचा रस्ताही मीच केला आहे, हे कदाचित त्यांना माहिती नसावे. मात्र माझ्याबाबत त्यांच्या मनात काही गैरसमज असल्यास आम्ही समोरासमोर बसून हे गैरसमज दूर करू. मात्र त्यांनी आधी माझ्या कामाची माहिती घेऊन मगच माझ्या उमेदवारीला विरोध करावा, असे प्रत्युत्तर खासदार संजय मंडलिक यांनी दिले आहे. ते आज कागल तालुक्यातील बिद्री येथे बोलत होते.

    आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून आणि उमेदवारीवरून भाजप व शिवसेनेमध्ये सध्या घमासान सुरू आहे. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य संग्राम सिंह कुपेकर यांनी संजय मंडलिक यांना उमेदवारी नको, असे म्हणत जाहीरपणे विरोध केला आहे.
    माने-मंडलिकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार, शाहू महाराज-राजू शेट्टींच्या विरोधात कोण?

    यासंदर्भात संजय मंडलिक यांनी त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले असून आपण विद्यमान खासदार असून महायुतीत शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व १३ खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. मी शंभर टक्के लोकसभेच्या मैदानात असणार आहे. आमचे कार्यकर्ते आतापासून कामाला लागले असून आता माघार घेणार नाही. आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही आणि निवडणुकीचे रिंगण आपल्याला काही नवीन नाही. महायुतीत जागेवरुन रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र कोल्हापुरातून विद्यमान खासदार म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्वजण एक होऊन आपल्या विजयासाठी झटतील. ही निवडणूक पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट करणारी असून आपल्या विजयाने याला हातभार लागणार आहे, असे संजय मंडलिक म्हणाले आहेत.
    आम्ही सांगितलं तरी त्यांना कुणी मत देणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांची मंडलिकांविरोधात उघड भूमिका

    काय बोलले होते कुपेकर?

    २०१९ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्याविरोधात आम्ही प्रचार केला ही आमची चूक झाली. निवडणुकीनंतर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा कुठल्याही गावाशी संपर्क नाही. आम्ही सांगितलं तरी त्यांना आता कोणी मत देणार नाही. गेल्यावेळी त्यांचा प्रचार करून आम्ही डोके फोडून घेतले. आता कुठेतरी दगा फटका झाला तर भाजपने काम केले नाही असा ठपका आमच्यावर नको. म्हणून विद्यमान खासदार सोडून दुसरा कोणीही उमेदवार चालेल. परंतु तो भाजपच्या कमळ चिन्हावर लढणारा हवा, अशी मागणी कुपेकर यांनी केली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed