• Sat. Sep 21st, 2024
नाशकातील लासलगावात कृषी सेवा केंद्राला भीषण आग, शेतीचे औषधे, बी- बियाणे जळून खाक

शुभम बोडके, नाशिक : लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला आग लागल्याची घटना आज रविवारी (१७ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली. विविध बी- बियाणे, रासायनिक औषधांसह खते जळून खाक झाल्याची घटना घडली घडली. दुकानातील फर्निचर आणि दुकानातील संपूर्ण दुकानातील साहित्य भस्मसाठ झाले आहेत. नेमकी दुकानाला आग का लागली? त्याचे कारण अजून समजू शकले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर योगेश कृषी एजन्सीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. आज रविवार असल्याने सदर दुकान बंद होते. मात्र दुपारी दोन वाजेच्या दरम्यान या कृषी सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर निघू लागला अन् काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.या आगीमुळे कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी असलेले शेतीपयोगी रासायनिक खते आणि कीटकनाशके भस्मसात झाली. या कृषी सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके व औषधांचा साठा असल्याने विषारी वायूचा धूर परिसरात हवेत काही काळ पसरला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमबद्दल आणि प्रशासनाने अथक प्रयत्न घेतले. आगीच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण पसरले होते. या घटनेत मात्र जीवितहानी टळली असल्याची माहिती समोर येत आहेत.
फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवताय का? भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याची ठाकरेंकडून खिल्ली

लासलगाव येथे यापूर्वीही देखील अनेक ठिकाणी भीषण आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. लासलगाव शहरासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाची गाडी अत्यंत आवश्यक असून लासलगावकरांनी अनेकदा अग्निशामक दलाच्या गाडीची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत लासलगाव शहरासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाच्या गाडीची व्यवस्था झालेली नाही. या घटनेने पुन्हा स्वतंत्र अग्निशमन दलाची गाडी लासलगाव करता मिळावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर आपत्कालीन यंत्रणा लासलगावकरिता कार्यान्वित करावी आणि अचानक घडत असलेल्या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी लासलगावकर प्रशासनाला करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed