• Mon. Nov 25th, 2024

    ‘त्याला कर नाही, त्याला डर कशाला’; शरद पवारांच्या आरोपावर बावनकुळेंनी दिले थेट उत्तर

    ‘त्याला कर नाही, त्याला डर कशाला’; शरद पवारांच्या आरोपावर बावनकुळेंनी दिले थेट उत्तर

    नागपूर : जागावाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या ८० टक्के जागांवर निर्णय झाला असून २० टक्के जागांवर १-२ दिवसांत निर्णय होणार असल्याचे सांगितले आहे. युतीमध्ये फारसा तणाव नसल्याचे ते म्हणाले. सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे. फॉर्म १-२ दिवसात प्रकाशित केला जाईल. बावनकुळे म्हणाले की, भाजपच्या जागेबाबत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

    विरोधकांचे काम कन्फ्युज करणारे आहे विरोधकांचे राजकारण हे कन्फ्युजन करणारे आहे. त्यामुळेच ते रोज सकाळी उठून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही असे लोक आहोत जे आमच्या सहकाऱ्यांशी आदराने वागतात. आमचे नेते सर्वांशी आदराने वागतात. आमच्या मित्रपक्षांनाही सन्मानाने जागा मिळतील.

    शरद पवार यांनी ईडी हे भाजपाचा सहकारी पक्ष आहे असा आरोप शरद पवार यांनी केला त्यावर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, “त्याला कर नाही, त्याला डर कशाला” तुम्ही जर चूक केली नाही तर ईडीच्या नोटीसला साधेपणाने उत्तर देता येते. उत्तर देण्याचे टाळून ईडी सारख्या यांत्रणाला प्रेशर करण्याचे काम होताना दिसत आहे. प्रत्येकावर चौकशी होतच राहते, ते जे या चौकशीला घाबरत आहे आणि या यंत्रणेवर प्रेशर तयार केले जात आहे. असेही बावनकुळे म्हणाले.

    उध्दव ठाकरे उद्या पासून विदर्भ दौऱ्यावर आहे त्यावर बोलतांना बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री असताना असा दौरा उध्दव ठाकरे यांनी केला असता तर विदर्भासह महाराष्ट्राचा फायद्याचे असते. मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस घराबाहेर निघाले. कोरोना काळात देवेंद्र फडणवीस हॉस्पिटल मध्ये फिरत होते आणि उध्दव ठाकरे घरात झोपून होते. आता तुमचे मुख्यमंत्री पद गेले तेव्हा तुम्ही दौरा करत आहे. उध्दव ठाकरे यांचा कडून जनतेला काही मिळाले नाही त्यामुळे जनता त्यांचा बाजूने राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *