• Mon. Nov 25th, 2024

    Baramati Constituency: बारामती मतदारसंघातून आली मोठी बातमी; शरद पवार आणि गेम चेंजर नेता एकत्र

    Baramati Constituency: बारामती मतदारसंघातून आली मोठी बातमी; शरद पवार आणि गेम चेंजर नेता एकत्र

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी आता अंतिम टप्यात आली असून जागा वाटपाचा तिढा देखील सुटत आला आहे. राज्यात सर्वात लक्षावेधी लढत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात देखील लढत आता जवळपास स्पष्ट झाली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होणार असल्याने या मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

    अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर होत असलेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे नेहमीच सोपी असणारी निवडणूक यंदा सुप्रिया सुळे यांच्यासाठी मोठी कठीण मानली जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या या कठीण काळात त्यांच्या विजयासाठी आता स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी आपले जुने कार्यकर्ते सक्रिय केले आहेत. जे मधल्या काळात पक्षापासून दुरावली होते अशा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील शरद पवार यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.

    आता याच रणनीतीचा एक भाग म्हणून थोपटे आणि पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नाव मात्र. आता एकत्र येताना दिसत आहे. शनिवारी (९ मार्च ) शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर-वेल्हा तालुक्यातील शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, संग्राम थोपटे, संजय राऊत, कुलदीप कोंडे हे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी संग्राम थोपटे त्यांची वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि संग्राम थोपटे हे एकाच मंचावर येणार असून सुप्रिया सुळे यांच्यासाठी मत मागणार आहेत.

    सुनेत्रा पवारांनी आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडील अंनंतराव थोपटे यांची घरी जाऊन वडिलांचे विचारपूस केली होती. आता स्वतः शरद पवार आणि संग्राम थोपटे एकच मंचावर येणार आहेत. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट थोपटे कुटुंबाशी जुळून घेताना दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर वेल्हा मुळशी मतदार संघात थोपटे यांचे वर्चस्व असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे भवितव्य बऱ्यापैकी याच मतदारसंघात ठरत आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे दोन्हीही गट थोपटे यांच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

    पवार – थोपटे संघर्ष सर्वश्रुत

    भोरचे आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आहेत. संग्राम थोपटे आणि त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांचं शरद पवारांच्या सोबत कधीच पटले नव्हते. मागील अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले गेले. हा संघर्ष संपूर्ण राज्याला सर्वश्रुत आहे. भोर मतदारसंघ हा संग्राम थोपटे यांचा मतदार संघ आहे. तो बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. शरद पवार आणि त्यांचं कधीच राजकारणात जमले नाही. फक्त शरद पावरच नाही तर हा विरोध अजित पवारांपर्यंत देखील सुरूच आहे. त्यामुळे अजित पवारांनीदेखील संग्राम थोपटेंचा विरोध करण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

    मात्र आता बारामतीची लढाई शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे. हे दोन्ही नेते थोपटे कुटुंबीयांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आधी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि आता शरद पवार हे संग्राम थोपटे यांच्या मतदारसंघात मेळावा घेऊन एकाच मंचावरून सुप्रिया सुळे यांच्यासाठी मत मागणार आहेत. मात्र पवारांशी वैर असलेलं थोपटे कुटुंब कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतं यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या होणाऱ्या खासदाराच भविष्य अवलंबून असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *