• Sat. Sep 21st, 2024
एकनाथ शिंदेंकडील दोन जागांवर आठवलेंचा डोळा, मुंबईचं उपमहापौरपद मिळवण्याचाही संकल्प

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने याआधीच राज्यातील तीन जागांवर दावा केला आहे. आता राज्यातील शिर्डी, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यासाठी रिपाइंचे कार्यकर्ते आग्रही असल्याची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी जाहीर केली. रिपाइं महायुतीतील घटक पक्ष असल्याने आमच्यासाठी किमान दोन जागा तरी सोडल्या पाहिजेत, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. महायुतीत शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर या जागा शिवसेनेकडे, तर सोलापूर भाजपकडे आहे.

रिपब्लिकन पक्षातर्फे शनिवारी चेंबूर येथे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ही भूमिका जाहीर केली. यावेळी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावने, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी उपस्थित होते.
हीना गावित यांचे काकाही लोकसभेला इच्छुक, शिंदे गटाचाही विरोध, नंदुरबारमध्ये विद्यमान खासदारांना डच्चू?
‘रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावा,’ असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
सुनेत्रा पवार चुलत सासऱ्यांच्या कट्टर विरोधकाच्या भेटीला, सुळेंना पाडण्यासाठी काँग्रेसच्या ६ टर्म आमदाराची मदत?
मुंबईचे उपमहापौरपद मिळविण्याचा रिपाइंचा संकल्प असून, त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात कामाला लागावे. जनतेत मिसळून जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

Read Latest National News Updates And Marathi News

महायुतीचे इतर नेते अनुपस्थित

या संकल्प मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, महायुतीतील एकही बडा नेता या मेळाव्यास उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed