• Sun. Sep 22nd, 2024

MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, कोणत्या तारखेला होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर

MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, कोणत्या तारखेला होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दि. ९ व १० मार्च रोजी घेतली जाणारी एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आता दि. ९ ते ११ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढल्याने परीक्षेचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आल्याची माहिती ‘सीईटी सेल’मार्फत देण्यात आली आहे.

राज्यभरातील एमबीए / एमएमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘सीईटी सेल’मार्फत प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या परीक्षेसाठी या परीक्षेचे वेळापत्रक ‘सीईटी सेल’मार्फत प्रसिद्ध करण्यात आले होते.
CET 2024: ‘सीईटी’साठी ९ लाखांवर नोंदणी, २ महिन्यांत दहा अभ्यासक्रमांसाठी प्रक्रिया पूर्ण
नोंदणी वाढल्याने निर्णय

जानेवारी महिन्यात नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच दि. ९ व १० मार्चला राज्यभरातील केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचे ‘सीईटी सेल’मार्फत जाहीर करण्यात आले होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांत या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी एक लाख ५२ हजार ९१० पर्यंत गेली आहे. ही नोंदणी प्रक्रिया बंद झालेली असली, तरी विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा आकडा अपेक्षेपेक्षा वाढल्याने परीक्षेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता दि. ९ ते ११ मार्चदरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे
हे लक्षात असू द्या…

– परीक्षेसाठी प्रवेशपत्र ‘सीईटी सेल’मार्फत लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे
– परीक्षेबाबतच्या सूचना, अभ्यासक्रम, गुणांकन पद्धती, अन्य माहिती ‘सीईटी सेल’च्या वेबसाइटवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed