• Mon. Nov 25th, 2024
    राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या सभा, सांगलीत वंचितचा उमेदवार फिक्स

    अकोला: आता मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका होणार आहे. मार्चच्या पहिल्या १५ दिवसांत महाराष्ट्रभरात प्रकाश आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहे. महाराष्ट्रात साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले आणि सांगलीत या ठिकाणी सभा होणार आहे.
    गायकवाडांकडून तरुणाला मारहाण; पत्रकार परिषद घेत शिंदेंचे आमदार म्हणतात, जराही पश्चाताप नाही
    विशेष म्हणजे सांगलीतील आंबेडकरांची सभा निर्णायक होणार आहे. सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास प्रकाश आंबेडकर मोठी भूमिका घेणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी ‘चंद्रहार पाटील’ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा वंचितच लढणार आहे, अशी माहिती वंचितच्या सूत्रांनी दिली आहे. वंचित महाविकास आघाडीकडे सांगलीची मागणी करणार आहे. चंद्रहार पाटलांनी मागच्या महिन्यात मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. या आठवड्यात चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा जाहीर होण्याची शक्यता आहे.

    तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांना पाणी नाही, सांगली पाटबंधारे कार्यालयात रोहित पाटलांचा अधिकाऱ्यांना घेराव

    ‘या’ तारखेला होणार आंबेडकरांच्या सभा
    ४ मार्च : साकोली
    ६ मार्च : नवी मुंबई
    ७ मार्च : मुंबई
    ८ मार्च : हातकणंगले
    १४ किंवा १५ मार्च : सांगली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *