• Sun. Sep 22nd, 2024

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2024
सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

मुंबई दि. 28 :- रायगड जिल्ह्यातील मौजे सांगवी या दरडप्रवणग्रस्त गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने करण्यात येणारी कामे व अन्य उपाय योजनांबाबत सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.

मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात कर्जत तालुक्यातील (जि.रायगड) मौजे सांगवी या दरडप्रवणग्रस्त गावाच्या स्थलांतराबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त विवेक गायकवाड,  उप सचिव सत्यनारायण बजाज, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, सांगवी गावात भारतीय भूवैज्ञानिक विभागाने (जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया- GSI) यांनी सूचविलेली कामे करण्यास प्राधान्य देण्यात यावे.  पावसाळ्यापूर्वी कामे करणे महत्वाची असल्याने संरक्षक भिंतीसह अन्य कामांचा सुधारित प्रस्ताव पाठवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. तसेच हा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांच्यामार्फत तातडीने सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed