• Sat. Sep 21st, 2024

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसानबाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता; निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा – मंत्री अनिल पाटील

ByMH LIVE NEWS

Feb 21, 2024
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसानबाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता; निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा – मंत्री अनिल पाटील

मुंबईदि. २१ :-  सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.  याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने  या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेलअसा विश्वास मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पीक व मालमत्ता नुकसानाच्या मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत होती. प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात  आली. यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना  दिलासा मिळणार आहेअशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली

राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत करण्यासाठी  विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर  कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानासाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यानंतरही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून  काही प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली व  निधी मंजुरीस मान्यता देण्यात आली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed