• Mon. Mar 16th, 2026
    अमरावतीत खासगी बस अन् काँक्रिकट मिक्सरचा अपघात, चार जणांचा मृत्यू, १० जण जखमी

    अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर ट्रॅव्हल्स आणि रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरचा अपघात झाला या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेनं अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी गर्दी केली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील कबड्डीपटू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सने निघाले होते. नांदगाव खंडेश्वर मार्गे यवतमाळला जात असताना समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सर ट्रकने पिवळ्या रंगाच्या ट्रॅव्हल्सला समोरासमोर जबर धडक दिली. या धडकेमुळं ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडून आला. प्राथमिक माहितीच्या आधारे या अपघातात चार कबड्डीपटूंचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दहा कबड्डीपटूंना परिसरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
    तोरणमाळमध्ये भीषण अपघात! प्रवासी वाहन पलटल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    स्पर्धेला पोहोचण्यापूर्वीच अनर्थ

    अमरावती जिल्ह्यातून हे खेळाडू कबड्डी स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यात निघाले होते. मात्र, स्पर्धेपूर्वीचं या कबड्डीपटूंवर काळानं घाला घातला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झालेले आहेत. या अपघातातील मृतांच्या नावांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेडी मिक्स काँक्रिट मिक्सरच्या धडकेनं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
    मथुरेत यमुना एक्सप्रेस वेवर बस-स्विफ्टचा विचित्र अपघात, कारमधील ५ जण जिवंत होरपळले

    जखमींवर उपचार सुरु

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर झालेल्या अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार सुरु आहेत. कबड्डी स्पर्धेला पोहोचण्यापूर्वीच हा मोठा अपघात घडला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed