• Sat. Sep 21st, 2024
उपोषणकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू, कुटुंबाचा मृतदेह पालिकासमोर ठेवून निषेध; नातेवाईक म्हणतात…

नांदेड : पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी माहापालिकेसमोर उपोषण करणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तींचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामदास लोखंडे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेनंतर नातेवाईक आणि सिटू संघटनेनं महापालिकेसमोर मृतदेह आणून महापालिकेचा निषेध केला.

मागील जुलै, ऑगस्ट महिन्यात नांदेड शहरात अनेक भागात पूर आला होता. राज्य सरकारकडून सर्व्हे करून अनुदान वाटप करण्यात आले. पण, अनेकांना मदत मिळाली नसल्याने सीटू कामगार संघटना आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी आमरण उपोषण सुरु आहे. आज १६ फेब्रुवारी रोजी साखळी उपोषणास ११२ दिवस पूर्ण होत आहेत. त्या साखळी उपोषणात सीटूचे सभासद कॉ. रामदास प्रसराम लोखंडे हे कमी अधिक प्रमाणात सहभागी होत होते. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चिपळूणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांमध्ये मोठा राडा, निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक
महापालिकेच्या मानसिक त्रासामुळेच रामदास यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रामदास यांच्या कुटुंबीयांनी तसेच सीटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर कुटुंबियांनी त्‍यांचा मृतदेह महापालिका मुख्यालयासमोर आणला होता. मृत रामदास यांच्या कुटुंबाचे शहरात पुनर्वसन करून त्यांच्या मुलाला नांदेड महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे. याशिवाय शहरातील पूरग्रस्त नागरिकांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed