• Mon. Nov 25th, 2024
    प्रेमाची कमिटमेंट: दृष्टी जाणार हे माहिती असतानाही विरोध झुगारून तिने त्याच्याशी लग्न केलंच!

    छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक मुलगी आयुष्याचा जोडीदार निवडताना तो दिसायला देखणा असावा, तो नोकरीला असावा, त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपलंही भविष्य सुरक्षित असावं असा विचार नक्कीच करते. मात्र या सगळ्या पारंपारिक विचारांना फाटा देत, आयुष्याचा जोडीदार दृष्टीहिन होऊ शकतो हे माहीत असताना देखील त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचा निर्णय एखाद्या मुलीने घेतला तर तो चित्रपटापुरता ठीक वाटेल मात्र प्रत्यक्ष आयुष्यात निर्णय घेण्याचं धाडस क्वचितच पाहायला मिळेल. मात्र हा धाडसी निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या पल्लवीने घेतला. एकाच गल्लीत राहणाऱ्या पल्लवी व निकेत यांचं प्रेम जुळल. भविष्यात प्रियकराची दृष्टी जाणार हे माहीत असताना तिने निकेतशी आंतरजातीय विवाह केला. लग्नानंतर पतीची दृष्टी गेली. मात्र पल्लवीने निकेतची साथ सोडली नाही. आता दोघांच्या सुखी संसाराला तेरा वर्षे पुर्ण झाली आहेत. दोघेही गुण्या गोविंदाने संसार करत आहेत.

    छत्रपती संभाजीनगर शहरातील नागेश्वरवाडीमध्ये राहणारे निकेत व पल्लवी हे दोघेही एकाच गल्लीत राहत असल्याने बालपणीचे मित्र होते. यामुळे लहानपणी गल्लीत दोघेही एकत्र खेळायचे. सरस्वती भुवन या शाळेतूनच दोघांनीही शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना दोघांची घट्ट मैत्री झाली. यानंतर पल्लवीने निकेतला प्रेमाचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला निकेतनही होकार दिला. पल्लवी आणि निकेतच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. त्यामुळे इतर प्रेमीयुगीलांप्रमाणे दोघेही एकमेकांना एकांतात भेटायला लागले. सोबत फिरायलाही जाऊ लागले. यामुळे दोघांच्या प्रेमाला बहर आला होता.
    मेहंदीच्या कार्यक्रमात भेट, पाहताक्षणी प्रेमात, हिंदू-मुस्लिम धर्म विसरले, माणुसकी धर्माने रबाना-अमोलला एकत्र आणलं!

    एक दिवस पल्लवी आणि निकेत हे दोघेही फिरायला जात असताना दुचाकी चालवणाऱ्या निकेतच्या डोळ्याला अचानक अंधारी आली. दोघे रस्त्यातून घरी परतले. निकेतने पल्लवीला सोडल्यानंतर तो डोळ्यांच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी गेला. यावेळी डॉक्टरांनी काचबिंदूचा त्रास असल्याचं सांगितलं. यापुढे जाऊन डॉक्टरने भविष्यात निकेतची कोणत्याही क्षणी दृष्टी जाऊ शकते असे सांगितले. यामुळे निकेतच्या पायाखालची जमीन सरकली.

    यामुळे भविष्यात आपली दृष्टी जाणार हे पल्लवीला कसे सांगावे? असा प्रश्न निकेतला पडला होता. याच दरम्यान त्यांची भेट झाली. निकेतने खरं काय ते सांगून टाकलं. पल्लवी माझी दृष्टी जाणार असल्यामुळे आपण लग्न न केलेलं बरं, असं निकेतने सांगताच पल्लवीच्या पायाखालची जमीन सरकली. यावेळी पल्लवी म्हणाले की, माझ्या बाबतीत हा प्रसंग उद्भवला असता तर तू काय निर्णय घेतला असता? यावर निकेत म्हणाला-मी लग्न केलं असतं. त्यावर पल्लवी म्हणाली- मी देखील तुझ्यासोबत लग्न करण्यावर ठाम आहे. यानंतर दोघांमध्ये एकमत झालं. मात्र दोघांच्या प्रेमातील हा एकमेव अडथळा नव्हता. तर दुसरा मोठा अडथळा होता ती दोघांची जात वेगवेगळी होती. निकेत जातीने ब्राह्मण होता, तर पल्लवी मराठा समाजाची होती. यानंतर कुटुंबीयांना सांगण्याची जबाबदारी पल्लवीने स्वतःच्या खांद्यावर घेत स्वतःच्या आई वडिलांना सांगितलं. दोघांना विरोध झाला. मात्र काही दिवसांनी आई-वडिलांनी लग्नास होकार दिला. याच दरम्यान दोघांनी एकमेकांच्या घरच्यांची समजूत काढल्यानंतर २००७ मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले.
    जातीमुळे लग्नाला नकार, पण घरच्यांची समजूत काढल्यावर होकार, IPS अधिकाऱ्याची खास लव्हस्टोरी

    उच्चशिक्षित पल्लवीने विवाह होण्यापूर्वीच खाजगी बँकेत नोकरी मिळवली. याच दरम्यान निकेत नोकरी शोधत होता. लग्नानंतर दोघांचा संसार सुरू झाला. संसारात सगळं काही सुरळीत असताना २०२२ साली निकेतची दृष्टी पूर्णपणे गेली. यामुळे निकेतच्या आयुष्यात पूर्णपणे अंधार निर्माण झाला. ऐन तारुण्यातच दृष्टी केल्यामुळे निकेत पूर्णपणे खचून गेला होता. दृष्टी नसल्याने तो बाहेर जाऊ शकत नव्हता. यामुळे त्याचं नैराश्य दिवसेंदिवस वाढत होतं. निकेतची ढासळत जाणारी परिस्थिती पल्लवीच्या लक्षात आली आणि त्यानंतर तिने निकेतला स्विमिंग आणि सायकलिंग करण्याचा सल्ला दिला. निकेतची ही आवडत होती. मात्र दृष्टी नसल्यामुळे हा छंद कसा जोपासणार? हा त्याच्यासमोरील प्रश्न होता. प्रियसीने दिलेला सल्ला निकेतने ऐकला. स्विमिंग आणि सायकलिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र आता निकेत अगदी परिपूर्ण झाला आहे.
    कॉलेजमध्ये नजरानजर, काही दिवसांत प्रेम, धर्माची भिंत आडवी आली, पण विरोध झुगारुन निकाह केलाच!

    पल्लवी आणि निकेत यांना एक बारा वर्षाचा मुलगा आहे. पल्लवीने स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय करत पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केले आहे. तर दृष्टी नसतानाही निकेत खासगी नोकरी करतो. गेल्या १३ वर्षापासून दोघांचा सुखी संसार सुरू आहे. निकेत व पल्लवीची ही प्रेरणादायी कहाणी अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

    प्रत्येक मुलगी आपल्या भावी जोडीदाराबरोबर आयुष्य घालवताना त्याचं सौंदर्य, त्याचबरोबर भविष्याची सुरक्षितता आवर्जून बघत असते. मात्र माझ्या प्रेमात मला विश्वासार्हता व त्याचबरोबर एक दुसऱ्यांनी दिलेला शब्द महत्त्वाचा होता. निकेतने त्याच्या चांगल्या काळामध्ये मला खूप काही आनंद दिला. मग मी त्याच्या वाईट काळामध्ये त्याची साथ का सोडेल? आमचं निस्वार्थी प्रेम होतं. त्यामुळे मी त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्याची दृष्टी गेली. मात्र मी त्याची साथ सोडली नाही. आजही आमचा संसार गुण्यागोविंदाने चाललाय, असं पल्लवी दलाल अभिमानाने सांगते.
    ना धर्माचं ना प्रांताचं बंधनं, प्रेमासाठी सात समुंदर पार, अमरावतीची श्रद्धा अमेरिकेची सूनबाई!

    आम्ही दोघं ज्यावेळी एकत्र आलो. त्यावेळेला आम्ही भविष्यासाठी अनेक स्वप्न रंगवली. मात्र दृष्टी गेल्याने त्या स्वप्नांवर विरजण पडलं. स्वतःच्या अंधकारमय भविष्यात एका सुंदर मुलीचं भविष्य खराब होऊ नये यामुळे मी तिला माझ्यासोबत लग्न करू नको, असा सल्ला दिला. मात्र ती तिच्या प्रेमावर ठाम होती. तिने मला खूप सुंदर साथ दिली आमचा सुखी संसार सुरू आहे. मी स्वप्नांमध्ये जगत असल्याचा भास मला पल्लवी सोबत लग्न केल्यानंतर होत असल्याची भावना निकेत व्यक्त करतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed