विश्वजीत कदम काय म्हणाले?
“अशोक चव्हाण यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांतून समजली. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या बातमीने मला वेदना झाल्या आहेत. परंतु वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे, की विश्वजीत कदम यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.” असं विश्वजीत कदम म्हणाले.
“मी आजही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अजूनही काम करत आहे. ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगराव कदम यांना भरभरुन प्रेम दिलं, साथ दिली, इथल्या त्याच माता भगिनी, ज्येष्ठ आणि तरुणांनी मलाही सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनात त्यांना विश्वासात न घेता मी कोणताही निर्णय घेणार नाही. कुठलाही गैरसमज पसरवू नये” अशी विनंती विश्वजीत कदम यांनी केली.
विशेष म्हणजे, मी अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं माजी आमदार अमर राजुरकर यांनी स्पष्ट केलं आहे. अशोक चव्हाण कोणत्या पक्षात जात आहेत माहिती नाही, असं ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
अशोक चव्हाण डिसेंबर २००८ ते नोव्हेंबर २०१० या दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्रिपद त्यांनी भूषवले आहे. अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
२०१० मध्ये आदर्श हाऊसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत अशोक चव्हाण यांनी आपल्या नातेवाईकांना घरं दिल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.