• Thu. Nov 28th, 2024
    दोघात उधारीचा वाद; भेटायला बोलवून तरुणाचा काढला काटा, रागात अल्पवयीन मुलाचं कृत्य

    यवतमाळ: उधार घेतलेले ३ हजार ५०० रूपये परत न केल्याने एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय तरूणाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना शहरातील गुरूनानक नगरातील आमदार संदीप धुर्वे यांच्या घराशेजारी ९ फेब्रुवारीला रा़त्रीच्या सुमारास घडली. सचीन सुखदेव माटे (३५) रा. गुरूनानक नगर, यवतमाळ असे मृत तरूणाचे नाव आहे.
    मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती: आधी समोरच्यावर गोळीबार, रिक्षातून पळताना स्वत:ला संपवलं; पुण्यात खळबळ
    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूनानक नगरात सचीन माटे हा कुटूंबीयांसह राहत असून मजुरीचे काम करीत होता. तीन महिन्यापूर्वी सचीन याने घरा शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून ३ हजार पाचशे रूपये उसणे घेतले होते. बरेच दिवस होऊनही सचीन पैसे परत करत नव्हता. अशात शुक्रवारी सचीन आणि त्या अल्पवयीन मुलामध्ये आमदार धुर्वे यांच्या घराशेजारी वाद झाला. दरम्यान रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने सचीन याच्यावर दगडाने वार करत त्याची निघृण हत्या केली.

    गोपीचंद पडळकर भाजपवर नाराज?; नव्या संघटनेची घोषणा, २५ शाखांचं उद्घाटन

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. या प्रकरणी मृतक सचीन याचे वडील सुखदेव माटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात मारेकरी अल्पवयीन मुलावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धैर्यशील घाडगे, कर्मचारी दिनेश निंबर्ते करत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed