• Mon. Nov 25th, 2024
    ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळीबार, ३ गोळ्या लागल्या

    मुंबई : शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. मुंबईतील दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला असून त्यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती कळतीये. दहिसर येथील करुणा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत.

    मॉरिस भाई नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याचं माहिती आहे. मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला तुरुंगात जायला लागलं, अशी त्याची धारणा होती किंबहुना संशय होता.

    तुरुंगातून सुटून आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली. आजही एका कार्यक्रमाला घोसाळकर यांनी आमंत्रित करून तिथेच त्यांच्यावर मॉरिसने गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

    गोळीबार कसा झाला?

    कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

    ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत. तसेच मुंबै बँकेचे ते संचालक देखील आहेत. अभिषेक हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी भांडणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *