• Sat. Sep 21st, 2024
आदित्य ठाकरे संतापले, अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई: ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. दहिसर येथे एका कार्यक्रमाच्या आधी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हा गोळीबार झाला. अभिषेक घोसाळकर यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचे मृ्त्यू झाला.

या घटनेवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक हे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानले जातात. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचे आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो समोर आले होते. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक देखील होते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी भांडणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख होती.

हे किती दिवस सहन करायचे? आदित्य ठाकरे संतापले

कल्याणमध्ये शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरील प्रकरणानंतर आज झालेल्या या घटनेवर आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. हे आणखी किती दिवस सहन करायचे असा सवाल उपस्थित करत यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे, असे आदित्य ठाकेर म्हणाले. अशा घटनांमुळे लोकांच्या मनात तर भिती आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योग विश्व देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

राज्यात गुंडा राज सुरू आहे. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे कारवाई झाली पाहीजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. इतक नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वांना घटनाबाह्य मुख्यमंत्री वाचवत असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिषेक यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. मॉरिस भाईने अभिषेक यांना एका कार्यक्रमाला बोलावलं होतं. कार्यक्रमाच्या आधी फेसबुक लाईव्हद्वारे अभिषेक माहिती देत असताना मॉरिस याने त्यांच्यावर गोळीबार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed