कोण आहे निलेश घायवळ ?
निलेश घायवळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजक थराराचा पुण्यात इतिहास आहे. यात दोन्ही टोळ्यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी अनेक कारनामे केले होते. कधीकाळी गजानन मारणे आणि निलेश गायवळ हे एकमेकांचे साथीदार असून एकमेकांनी एकत्र गुन्हा घडवला होता. त्या आरोपाखाली दोघांना शिक्षा देखील झाली होती. जेलमधून बाहेर पडल्यानंतर गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात वाद झाला आणि दोघांचे फाटाफूट झाली. यामध्ये गुन्हेगातल्या निलेश घायवळ टोळी विरुद्ध गजानन मारणे युद्ध रंगला होता.
निलेश घायवळ ई-कॉमर्सचा विद्यार्थी
“बॉस Boss” या नावाचा दबदबा पुणे शहरातल्या गल्लो गल्लीत आहे. साल २००० ते २००३ आपलं नाव गुन्हेगारीतल्या वर्चस्वामध्ये गाजवलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा राहणार सोनेगाव ता. जामखेड मधला आहे. शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याची भेट गजानन मारणेसोबत झाली. गजानन मारणेसोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला होता. त्यानंतर त्यांनी ७ वर्षाची शिक्षाही भोगली होती. जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाच्या व्यवहाराने वाद झाला. यामध्ये घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे खून मारणे टोळीने केला होता. तर त्याच्या बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला. हा रक्तरंजक थरार पुढे आणखीनही वाढत गेला आणि असेच एकमेकांच्या सहकाऱ्यांचा खून होत गेला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टोळी प्रमुखांना अटक केली होती.
निलेश बन्सीलाल घायवळ मूळ राहणार सोनेगाव ता. जामखेडचा मधील आहे. निलेश घायवळ विरोधात पुण्यात विविध पोलीस ठाण्यात २३ ते २४ गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळचं उच्चशिक्षित मास्टर इन कॉमर्सपर्यंत शिक्षण झालं आहे.
संजय राऊत यांचं ट्विट
महाराष्ट्रात गुंडा राज:
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..लहान मुलांना पालक नेहमी सांगत असतात आपली संगत ही चांगल्या, उच्च शिक्षित, कर्तृत्वान लोकांनासोबत असावी, ना की गुन्हेगारी टोळक्यांसोबत. मात्र, आता गुन्हेगारांना राज्यातल्या सर्वउच्च पदावर असलेल्या नेत्यांकडून अभय मिळत आहे. त्यामुळे आत येणाऱ्या पिढीच्या पालकांनी काही वेगळा विचार करावा का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीक करत आहेत. पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख आहे. परंतु काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळे पुणे शहराला गुन्हेगारीचं शहर अशी ओळख झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे हे गुन्हेगारांना अभय देतात गुन्हेगारांसोबत राज्यकर्त्यांचा संबंध काय आहे? फोटो का व्हायरल करत आहे? त्याचे कारण राज्यकर्त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.