• Sat. Sep 21st, 2024
तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा द्या, अनेक नेत्याचं म्हणणं – छगन भुजबळ

अहमदनगर: सरकारमधील लोक आणि विरोधी पक्षाचे नेते भुजबळ तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा द्या, असं अनेक नेते बोलतात. एका नेत्याने सांगितलं की भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सर्व नेत्यांना सांगायचं आहे की, अंबडमध्ये १७ नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेचे १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गोप्यस्फोट छगन भुजबळांनी अहमदनगरमध्ये ओबीसी मेळाव्यात केला आहे.
आरक्षण मिळालं, गुलाल उधाळला, तर पुन्हा उपोषण कशाला? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल
ते पुढे म्हणाले की, मला हाकलण्याची गरज नाही. मी अडीच महिने शांत राहिलो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको. मी ओबीसीसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. मी मनाशी एकच उद्देश ठेवला आहे, तो म्हणजे जीवन हे संग्राम, बंदे ले हिंम्मत से काम…, असं भुजबळ या मेवाळ्यात म्हणाले आहेत. आज अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांजवळ संवाद साधला आहे.

दरम्यान छगन भुजबळांनी त्यांच्या भाषणात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, एव्हढा मोठा जोक कधी झालाच नव्हता. उपोषणवाले साहेब म्हणतात, बजेटमधून आरक्षण मिळालं तर बघा. मला याचं वाईट वाटलं. सीतारामन सगळं बोलल्या मात्र आरक्षणाचं काही बोलल्याच नाहीत. मला काही समजत नाही. मला मराठा समाजातील नेत्यांची आणि विचारवंतांची कीव येते. असा कसा तुमचा नेता, जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येतं का पहा. यावर कोणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे चाललात तुम्ही, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, मगच अंबडच्या सभेला गेलो; भुजबळांचा गौप्यस्फोट

ते पुढे म्हणाले की, गावागावात दरी पडत आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करु नका. त्यांना आरक्षण वेगळं द्या. ही आमची मागणी चुकीची आहे का? आज गावागावात ओबीसींना छळलं जात आहे. पोलीस तक्रार घेत नाहीत. तरीही उपोषणकर्ता म्हणतो, पूर्ण मंडल आयोगच चॅलेंज करून संपवून टाकतो. त्यांना ओबीसीमधून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचं आहे. मात्र त्या मंडलमध्ये ओबीसी आरक्षण आहे ना. ते संपलं तर हे ही जाईल. तरीही हे का मागता? सर्व ठिकाणी दादागिरी चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed