ठाणे : उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील रुग्णालयात भेट देऊन या सर्व घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कालपासून आम्ही सर्व लोकं याठिकाणी आहेत. काल रात्री राहूल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला. त्याच्यानंतर जखमींना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. महेश गायकवाड यांच्यावर सहा तास शस्त्रक्रिया चालली. त्यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या आहेत. त्या सहा गोळ्या डॉक्टरांनी काढल्या आहेत. त्यानंतर, महेश गायकवाड यांना आयसीयूमध्ये पहाटे साडेसहाच्या दरम्यान अॅडमिट केलंय. त्याची परिस्थिती आताही गंभीर आहे. डॉक्टरांचं त्यांच्यावर लक्ष आहे. राहूल पाटील यांच्यावर देखील दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यांच्यावर देखील शस्त्रक्रिया झाली आहे. त्या गोळ्याही काढण्यात आल्या असून, ते देखील आयसीयूमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये येऊन चौकशी केली. डॉक्टरांसोबत देखील त्यांनी चर्चा केली. दोघंही सुखरुप बाहेर निघतील त्यासंदर्भात देखील चर्चा झाली, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
सीसीटीव्ही फुटेज आता सर्वांसमोर आहेत. पोलीस देखील या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत. कोणा काय म्हणतंय? यापेक्षा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे? सत्य काय आहे? हे लोकांच्या समोर आलं आहे. या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोलीस लवकरात लवकर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, असं श्रीकांत शिंदें हॉस्पिटलच्या आवारात असताना म्हणाले.

पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं?
काल शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. मात्र, काही वेळातच हिललाईन पोलीस स्टेशनच्या आतच या वादात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे जखमी महेश गायकवाड यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.