• Sun. Sep 22nd, 2024
एपीएमसी बाजारात आंब्याची विक्रमी आवक; ३६० पेट्या बाजारात दाखल, जाणून घ्या दर

नवी मुंबई: एपीएमसी फळ मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात आंब्याची विक्रमी आवक झाली असून ही आवक इतिहासातील विक्रमी आवक झाली असल्याचे पाहायला मिळते. ह्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. मात्र यंदाच्या हंगामातील हापूस आंबा एपीएमसी बाजारात यायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूस आंब्याची विक्रमी आवक झाली असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.
नारायण राणेंना भेटून सांगतो, जरा तुमच्या पोराला आवरा; नरसय्या आडम भडकले
यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये ३६० पेट्यांची आवक झाली आहे. ही आवक विक्रमी झाली असल्याचे पानसरे यांनी सांगितले. या आंब्याच्या प्रत्येक पेटीला कॉलिटीनुसार सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे. कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल झाला आहे. अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे.

अजित पवारांच्या बारामतीत जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी

या आंब्याला दरही चांगला मिळत आहे. जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात हापूसची आवक झाली आहे. ही आवक इतिहासातील सर्वोच्च अशी विक्रमी आवक असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. बाजारत दाखल झालेल्या ३६० पेट्यांपैकी देवगडमधून सर्वाधिक २५० पेट्यांची आवक झाली आहे. तर, रत्नागिरीतून राजापूर ८० आणि बाणकोटमधून ४० बॉक्सची आवक झाली आहे. ही विक्रमी आवक असून ग्राहकांची देखील पसंती मिळत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed